
कोल्हापूर, 28 जुलै, (हिं.स.)। नशामुक्त अभियान कोल्हापूर 13 जून पासून सुरु करण्यात आले आहे. नशा मुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद येथे आयोजित स्व. अजित पवार यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह अंतर्गत वैरण बियाणे वाटप व विविध वैयक्तिक लाभांच्या योजना सन 2026-27 अर्ज विमोचन कार्यक्रमात नशा मुक्ती शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, सभापती समाज कल्याण, अर्थ व शिक्षण समिती, बांधकाम व आरोग्य समिती, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद सदस्य, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar