देशाचे औद्योगिक उत्पादन जूनमध्ये 7.3 टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)। अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरून दिलासादायक बातमी आहे. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि वीज तसेच गॅस पुरवठा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे जून महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन 7.3 टक्क्यांनी वाढले आहे. या
Indias industrial production Output Grows


नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)। अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरून दिलासादायक बातमी आहे. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि वीज तसेच गॅस पुरवठा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे जून महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन 7.3 टक्क्यांनी वाढले आहे. यापूर्वी मे महिन्यात हा वाढीचा दर 5.1 टक्के होता. त्याच्या तुलनेत जूनमधील वाढ लक्षणीयरीत्या अधिक आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) आधारित औद्योगिक उत्पादनात वार्षिक आधारावर 7.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीत उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील 7.8 टक्के आणि वीज क्षेत्रातील 10.6 टक्के वाढीचा मुख्य वाटा आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जून 2026 साठी आयआयपीचा वाढीचा दर 7.3 टक्के असून, मे 2026 मधील 5.1 टक्के (जूनमध्ये जारी केलेला तात्पुरता अंदाज) या तुलनेत अधिक आहे. मे महिन्यासाठी आयआयपीचा सुधारित अंदाज 5 टक्के आहे. नव्या मालिकेवर आधारित औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) ची ही तिसरी मासिक आकडेवारी आहे.”

आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर तुलना केल्यास जूनमध्ये खाण आणि संबंधित क्षेत्रातील उत्पादनात 1 टक्का, उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात 7.8 टक्के, तर वीज आणि गॅस पुरवठा तसेच जलपुरवठा क्षेत्रातील उत्पादनात 10.6 टक्के आणि सांडपाणी व कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील उत्पादनात 6.1 टक्के वाढ झाली. तसेच उत्पादन क्षेत्रातील 23 उद्योग गटांपैकी 19 गटांनी जून 2025 च्या तुलनेत जून 2026 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, जून 2026 मध्ये सर्वाधिक सकारात्मक योगदान देणाऱ्या पहिल्या तीन क्षेत्रांमध्ये विद्युत उपकरणांचे उत्पादन (34 टक्के) अग्रस्थानी राहिले. याशिवाय मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलर उत्पादन (17.5 टक्के) तसेच अन्न उत्पादनांचे उत्पादन (10.8 टक्के) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande