परभणी - बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात मानस गायकवाड तर महिला गटात वेदिका सवंडकर प्रथम
परभणी, 28 जुलै (हिं.स.)। परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित कै. वत्सलाबाई राके स्मृती बुद्धिबळ स्पर्धा - 2026 उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. जलद बुद्धिबळ (रॅपिड) पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत परभणीसह राज्यातील विविध जिल्ह्य
बुद्धिबळ स्पर्धेत खूल्या गटात मानस गायकवाड तर महिला गटात वेदिका सवंडकर प्रथम; कै. वत्सलाबाई राके स्मृती बुध्दीबळ स्पर्धा


परभणी, 28 जुलै (हिं.स.)। परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित कै. वत्सलाबाई राके स्मृती बुद्धिबळ स्पर्धा - 2026 उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. जलद बुद्धिबळ (रॅपिड) पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत परभणीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 160 बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व वयोगटांतील खेळाडूंनी दर्जेदार व चुरशीच्या लढती देत आपले कौशल्य सिद्ध केले.

खुल्या गटात रेटिंगधारक मानस गायकवाड (2157) याने 7.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत 8,100 रोख, आकर्षक चषक व मानचिन्हावर नाव कोरले. आशिष चौधरी (2001) याने 7 गुणांसह द्वितीय, तर कृष्णा कुलकर्णी याने तृतीय क्रमांक मिळविला. त्यानंतर देवदत्त पटवर्धन चौथा, विशाल जी. पटवर्धन पाचवा, ओंकार वानखेडे सहावा, तर सातव्या ते पंधराव्या क्रमांकापर्यंत विविध खेळाडूंनी प्रत्येकी सहा गुण मिळवत स्थान पटकाविले. स्पर्धेची एकूण पारितोषिक रक्कम 51 हजार इतकी असून विविध गटांतील विजेत्यांसह एकूण 90 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. महिला गटात वेदिका सवंडकर प्रथम, ऋतुजा कदम द्वितीय आणि श्रेया पारपेल्ली तृतीय ठरल्या. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आदिराज म्हेत्रे, प्रवीर देशमुख आणि सत्यजित गायकवाड, तर मुलींच्या गटात अवनी कापसे, ईशा पटवर्धन आणि हर्षिता खाटिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात आयुष वडगावकर, आदित्य गायकवाड आणि वरद बोखारे, तर मुलींच्या गटात समृद्धी काटले, स्वरा जाधव आणि प्रतीक्षा पांचाळ यांनी बाजी मारली. 13 वर्षांखालील मुलांमध्ये प्रसेनजित जांभळे, सर्वज्ञ टाकळकर आणि अर्णव पेदापल्ली, तर मुलींमध्ये सानवी विनोद निकम, अनुष्री वसमतकर आणि गार्गी संघी हे विजेते ठरले. 11 वर्षांखालील मुलांच्या गटात शौर्य मुप्पानेनी, पार्थ शामे आणि देवांश चव्हाण, तर मुलींच्या गटात सान्निधी पाटील, गौरी मंत्री आणि सह्याद्री घाटगे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. 9 वर्षांखालील मुलांमध्ये निश्चय ऐतवाडे, आरव देशमुख आणि विराज देशमुख, तर मुलींमध्ये श्रीनिधी देशमुख, अंशिका अवर्दे आणि दिव्या सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 7 वर्षांखालील मुलांच्या गटात शर्विल कोकणे, विधाण अग्रवाल आणि श्रीनिश भिसे यांनी अव्वल स्थान मिळविले. सर्वोत्कृष्ट अकादमीचा पुरस्कार सक्षम चेस अकॅडमीने पटकाविला, तर समर्थ चेस अकॅडमी द्वितीय ठरली. प्रथमेश चेस अकॅडमी, विहान चेस अकॅडमी आणि ट्रँक्विल माइंड यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विशेष पुरस्कारांमध्ये लोहट इंद्रनील याचा सर्वात लहान खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आला, तर पूजा अग्रवाल, विद्या नरडेले आणि देवांशी चापके यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक दिलीप राके, विजय राके आणि अनिल राके यांनी विशेष परिश्रम घेतले. परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संभाजी बिल्पे, उपाध्यक्ष धनराज कांकरिया, सचिव अनिल सेलगावकर तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक डॉ. दिनकर हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन समितीने स्पर्धेचे नियोजन केले. मुख्य पंच म्हणून उदय वगरे (सोलापूर) यांनी काम पाहिले. त्यांना सुचिता हंबर्डे, सक्षम हंबर्डे, चैतन्य गोरवे, रोहन तुरे, शुभम शहाणे आणि कोरे यांनी सहकार्य केले. स्वयंसेवक, पालक, खेळाडू आणि बुद्धिबळप्रेमी यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेमुळे परभणी जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande