गंगापूर धरणावर महापौरांच्या हस्ते जलपूजन
नाशिक, 28 जुलै (हिं.स.)। :- गंगापूर धरणातील जलपूजनाचा मान महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी मिळाला आहे. आज सकाळी त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. एल निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये प
Mayor performs water puja


नाशिक, 28 जुलै (हिं.स.)।

:- गंगापूर धरणातील जलपूजनाचा मान महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी मिळाला आहे. आज सकाळी त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

एल निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये पाऊस कमी झाल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र जुलैतील जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाणी कपात मागे घेण्यात आली. गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी महापौरांच्या हस्ते जलपूजनाची परंपरा आहे.

नाशिकचे प्रथम महापौर स्व. शांतारामबापू वावरे यांच्या काळात जलपूजनाची परंपरा सुरू झाली. त्यानंतर १३ मार्च २०२२ पासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने चार वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. आता महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाल्याने ही परंपरा पुन्हा सुरू झाली आहे.

गंगापूर धरण येथे जलपूजन कार्यक्रमप्रसंगी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा गटनेते अॅड. श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या सीमा ठाकरे, उबाठा गटनेते केशव पोरजे, मनपा आयुक्त मनिषा खत्री, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रविंद्र धारणकर, मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande