पंतप्रधान मोदींचा फेसबुक व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाने मागितली माफी
नवी दिल्ली , 28 जुलै (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फेसबुक व्हिडिओ काही काळासाठी हटवण्यात आल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. मेटा कंपनीने या घटनेबाबत सरकारची माफी मागत, हा व्हिडिओ कोणत्याही धोरणाच्या उल्लंघनामुळे नव्हे तर तांत्र
पंतप्रधान मोदींचा फेसबुक व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाने मागितली माफी


नवी दिल्ली , 28 जुलै (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फेसबुक व्हिडिओ काही काळासाठी हटवण्यात आल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. मेटा कंपनीने या घटनेबाबत सरकारची माफी मागत, हा व्हिडिओ कोणत्याही धोरणाच्या उल्लंघनामुळे नव्हे तर तांत्रिक बिघाडामुळे चुकून हटवला गेल्याचे मान्य केले आहे. तसेच, ही चूक लक्षात येताच संबंधित व्हिडिओ पुन्हा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत व्हिडिओला नेमके कोणत्या कारणामुळे हटवण्यात आले आणि मेटाने दिलेले तांत्रिक बिघाडाचे स्पष्टीकरण कितपत योग्य आहे, याची चौकशी संबंधित विभागांकडून सुरू आहे. या प्रकरणी मेटाच्या प्रतिनिधींना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टीकरणासाठी बोलावले जाऊ शकते, अशीही माहिती मिळत आहे.

मेटाच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, संबंधित व्हिडिओ चुकून हटवला गेला होता आणि तो आता पूर्णपणे पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. या घटनेबद्दल कंपनीने खेदही व्यक्त केला आहे. माहितीनुसार, मेटाच्या मालकीच्या फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ भारतात काही काळासाठी दिसेनासा झाला होता. मात्र, नंतर निर्बंध हटवल्यानंतर तो पुन्हा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आला.

हा व्हिडिओ २३ जुलै रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) आयोजित विद्यार्थी आंदोलनादरम्यान प्रथमच जेन जी पिढीला संबोधित करत आपला संदेश दिला होता. आपल्या भाषणात त्यांनी परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी लवकरच नवीन आणि अधिक कडक उपाययोजना लागू करण्याचे संकेत दिले होते. व्हिडिओ हटवण्यापूर्वी त्याला लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांनी पाहिले होते. आता मेटाने आपली चूक मान्य केल्यानंतर, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande