राजू शेट्टी यांनी माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी नांदणी मठात केला एकदिवसीय उपवास
कोल्हापूर, 28 जुलै (हिं.स.)। आज नांदणी मठाच्या माधुरी हत्तीला वनतारा येथे जावून १ वर्ष पुर्ण होत आहे. सर्वोच्च न्यायालय , हाय पॅावर कमिटी व वनतारा यांनी माधुरी हत्ती नांदणी मठाकडे परत करण्याबाबत निर्णय होवूनही हत्ती पाठविण्यात विलंब होत आहे. स्वाभि
राजू शेट्टी यांचा नांदणी मठात “माधुरी हत्तीसाठी एकदिवसीय उपवास


कोल्हापूर, 28 जुलै (हिं.स.)। आज नांदणी मठाच्या माधुरी हत्तीला वनतारा येथे जावून १ वर्ष पुर्ण होत आहे. सर्वोच्च न्यायालय , हाय पॅावर कमिटी व वनतारा यांनी माधुरी हत्ती नांदणी मठाकडे परत करण्याबाबत निर्णय होवूनही हत्ती पाठविण्यात विलंब होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी “माधुरी हत्तीच्या घरवापसी साठी एकदिवसीय उपवास” करून नांदणी निशिधीका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्प करण्यात आला.

वनतारा कडून नांदणी याठिकाणी अद्यावत सोयीसुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. तरीही माधुरी हत्ती येण्यास विलंब लागत असल्याने आज वर्षपुर्तीनिम्मीत्त “माधुरी हत्तीच्या घरवापसी साठी एकदिवसीय उपवास” करून नांदणी निशिधीका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्प करण्यात आला.

सहकारी महादेव जानकर यांच्यासह माधुरी हत्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व सहका-यांसोबत आज सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आज हा उपवासाचा जनसंकल्प असणार आहे.

१३ सप्टेंबर रोजी नांदणी याठिकाणी प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांची १०० वा चातुर्मास निम्मीत्त ७१ वी ऐतिहासिक पुण्यतिथी साजरी होणार आहे.

१३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सांगली , कोल्हापूर व उत्तर कर्नाटकातून जवळपास ३ लाख भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यामुळे या अमृतयोग असणाऱ्या महोत्सवाला नांदणी मठाच्या १३०० वर्षांच्या इतिहासातील जी ४०० वर्षांची हत्तीला प्रथम गजराजाचा जो मान देण्यात आला आहे तो मान माधुरी हत्तीसोबत साजरा होणे आवश्यक आहे.

नांदणी येथे सुरू असलेल्या “एक उपवास माधुरी हत्तीच्या घरवापसी साठी “या जनसंकल्प उपक्रमास उपस्थित राहून आचार्य श्री १०८ विद्यासागर जी मुनी महाराज यांनी आशिर्वचन केले.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या लढ्यात सर्व घटकांनी , समाजांनी दिलेले योगदान यामुळे हा लढा यशस्वीपणे उभारला जावू लागला आहे.

येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या प. पू. आचार्यरत्न १०८ शांतीसागर महाराज यांच्या ७१ व्या पुण्यतिथी निम्मीत्त माधुरी हत्तीला आणण्यासाठीचा आशिर्वाद सर्व घटकांना दिला.

यावेळी राजू शेट्टी व माजी मंत्री महादेव जानकर यांनी महाराजांची पाद्यपूजा करून आशिर्वादाचे सौभाग्य प्राप्त करून घेतले.

केंद्रीय मंत्री. प्रतिक पाटील , दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी शशिकांत राजोबा , संदीप राजोबा , अजित भंडे निमशिरगांव ता. शिरोळ व इंगळी ता. हातकंणगले येथील महिलांनी माजी आ. राजीव आवळे , जि. प. सदस्य. राहूल आवळे , जि. प. सदस्य सौ. नंदिनी कांबळे , चकोते उद्योग समुहाचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, राजाराम देसाई , संदीप कांबळे तिवडे, दत्त उद्योग समुहाचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले , उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील , वीर सेवा दल अध्यक्ष विजय पाटील , पंचायत समिती सदस्या निलमताई म्हेत्रे , शेखर पाटील , दरगू गावडे यांचेसह मान्यवरांनी पाठिंबा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande