बीड - छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान संपन्न
बीड, 28 जुलै (हिं.स.)। ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान'' अंतर्गत शिबिरास उपस्थित राहिले. या शिबिरात महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प
अ


बीड, 28 जुलै (हिं.स.)। 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' अंतर्गत शिबिरास उपस्थित राहिले. या शिबिरात महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.

या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व अभिलेख दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८अ उताऱ्यांचे वितरण, उत्पन्न, रहिवासी, जाती व इतर आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप, ॲग्रीस्टॅक (Farmer ID) नोंदणी, पी.एम. किसान तक्रार निवारण, महिलांना शेतकरी प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वितरण तसेच महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या शासनाच्या संकल्पनेला बळ देणारे हे समाधान शिबीर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

यावेळी अंबाजोगाई नगरीचे नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन अक्षय मुंदडा, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे तहसीलदार विलास तरंगे , सचिन देशपांडे साहेब (सी.ओ अंबाजोगाई नगर परिषद), तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande