बीडच्या जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
बीड, २८ जुलै (हिं.स.) : जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जित
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न


बीड, २८ जुलै (हिं.स.) : जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इगारे यांच्यासह जिल्ह्यातील विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आणि संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून योजनांची सद्यस्थिती आणि प्रगतीबाबत माहिती सादर करण्यात आली.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande