विवोने टी सिरीजमधील नवीन स्मार्टफोन विवो टी५ई केला लॉन्च
मुंबई, 28 जुलै (हिं.स.)। विवोने भारतीय बाजारपेठेत आपल्या टी सिरीजमधील नवीन स्मार्टफोन विवो टी५ई लॉन्च केला आहे. टी५ लाइनअपमधील हा चौथा स्मार्टफोन असून यापूर्वी कंपनीने विवो टी५ लाईट ५जी, विवो टी५ प्रो ५जी आणि विवो टी५एक्स ५जी हे मॉडेल्स बाजारात आणल
Vivo Launches New T-Series Smartphone Vivo T5e


मुंबई, 28 जुलै (हिं.स.)। विवोने भारतीय बाजारपेठेत आपल्या टी सिरीजमधील नवीन स्मार्टफोन विवो टी५ई लॉन्च केला आहे. टी५ लाइनअपमधील हा चौथा स्मार्टफोन असून यापूर्वी कंपनीने विवो टी५ लाईट ५जी, विवो टी५ प्रो ५जी आणि विवो टी५एक्स ५जी हे मॉडेल्स बाजारात आणले होते. आता कंपनीने विवो टी५ई हा परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. विशेष म्हणजे या फोनची सुरुवातीची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने विद्यार्थी, तरुण आणि बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा आकर्षक पर्याय ठरणार आहे.

विवो टी५ईमध्ये ६.७४ इंचांचा एचडी प्लस एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला असून तो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्यामुळे स्क्रीन स्क्रोलिंग आणि दैनंदिन वापर अधिक स्मूथ होतो. हा ड्युअल सिम स्मार्टफोन अँड्रॉइड १६ आधारित ओरिजिनओएस ६ या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत आहे. फोनला आयपी६४ रेटिंग देण्यात आली असून त्यामुळे धूळ आणि हलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षण मिळते. याशिवाय मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी सर्टिफिकेशन असल्याने रोजच्या वापरात पडणे किंवा किरकोळ धक्के बसल्यास फोन अधिक टिकाऊ राहील, असा कंपनीचा दावा आहे.

परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर युनिसॉक टी७२२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यासोबत ४ जीबी रॅम देण्यात आली असून व्हर्च्युअल रॅम एक्स्पान्शनच्या मदतीने ती आणखी ४ जीबीपर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध असून मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ती तब्बल २ टीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये ५,५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून १५ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा फोन १८ तास ऑनलाइन व्हिडीओ प्लेबॅक, ४७ तास म्युझिक प्लेबॅक, १३.५ तास सोशल मीडिया वापर आणि २८ तास व्हॉइस कॉलिंगचा बॅकअप देऊ शकतो. तसेच चार वर्षांपर्यंत बॅटरीची कार्यक्षमता चांगली राहील, असा दावाही कंपनीने केला आहे.

विवो टी५ई हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या एकमेव व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत १३,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन एरो ब्ल्यू आणि शॅडो ग्रे या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना तो व्हिवोच्या ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट तसेच देशभरातील अधिकृत ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे. कमी किमतीत आवश्यक फीचर्स, मोठी बॅटरी आणि टिकाऊ डिझाइन देणारा हा स्मार्टफोन बजेट श्रेणीत चांगली स्पर्धा निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande