'सौभाग्यवती वृंदा मोहन'मधील मोहनच्या भूमिकेत झळकणार अभिनेता संग्राम समेळ
मुंबई, 08 जुलै (हिं.स.)। ''सन मराठी''वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. ''सौभाग्यवती वृंदा मोहन'' या मालिकेच्या पहिल्या भाग प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपास
संग्राम


मुंबई, 08 जुलै (हिं.स.)। 'सन मराठी'वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. 'सौभाग्यवती वृंदा मोहन' या मालिकेच्या पहिल्या भाग प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ते पहिल्या भागापर्यंत मुख्य अभिनेता म्हणजेच मोहन ही भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात होतं. अखेर मोहन ही भूमिका साकारणारा अभिनेता संग्राम समेळ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 'सौभाग्यवती वृंदा मोहन' ही मालिका दररोज रात्री ९:४५ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते

मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल अभिनेता संग्राम समेळ म्हणाला की, फायनली, मोहन हे पात्र कोण साकारणार याचा उलगडा आता प्रेक्षकांसमोर झाला आहे. मोहन ही व्यक्तिरेखा खूप सुंदर आणि भावनिक आहे. तो आपल्या कुटुंबावर आणि वृंदावर जिवापाड प्रेम करणारा आहे. पण वृंदा आणि मोहन यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक आणि रहस्यमय ठरणार आहे.एखाद्या थ्रिलर सिरीजप्रमाणे आमची ही मालिका आहे. आजच्या युवा पिढीला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील थ्रिलर सिरीज पाहायला आवडतात. त्यामुळे मी त्यांना आवर्जून सांगेन की, ही मालिका खास तुमच्यासाठी आहे. पहिला भाग पाहायला सुरुवात केली की पुढे काय होणार, याची उत्सुकता सतत लागून राहील. मुळात मोहन आणि माझ्यात अजिबात साम्य नाही. त्यामुळे मोहनची भूमिका साकारणं माझ्यासाठीही एक मोठं आव्हान आहे.

यापुढे तो म्हणाला की, वर्षभरानंतर मी पुन्हा सन मराठीवर मुख्य भूमिकेत काम करत आहे. मात्र, यावेळी मी मुख्य भूमिका साकारत असल्याचं गुपित जपणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मालिकेचे एकापेक्षा एक भन्नाट प्रोमो प्रेक्षकांसमोर येत होते, पण मी या मालिकेचा मुख्य नायक आहे, हे सांगू शकत नव्हतो. मोहन कोण आहे, हे गुपित ठेवल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे.आमच्या मालिकेची संपूर्ण टीमही खूप छान आहे, त्यामुळे काम करताना खूप मजा येते. प्रेक्षकांना जशी पुढे काय घडणार याची उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता आम्हा कलाकारांनाही आहे. यापूर्वी माझ्या प्रत्येक भूमिकेवर तुम्ही जसं भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम मोहनवरही करा आणि आमच्या मालिकेला असंच भरभरून प्रेम देत राहा.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande