नथिंग फोन (4बी) भारतात लॉन्च
मुंबई, 08 जुलै (हिं.स.)। नथिंग कंपनीने भारतीय बाजारात आपला पहिला ‘बी’ सीरिज स्मार्टफोन नथिंग फोन (4बी) अधिकृतपणे लॉन्च केला आहे. कंपनीने स्टँडर्ड मॉडेलसोबत नथिंग फोन (4बी) आरसीबी एडिशन देखील सादर केले असून, हे विशेष एडिशन बेंगळुरू येथील नथिंगच्या फ
Nothing Phone (4b) Launched in India


मुंबई, 08 जुलै (हिं.स.)। नथिंग कंपनीने भारतीय बाजारात आपला पहिला ‘बी’ सीरिज स्मार्टफोन नथिंग फोन (4बी) अधिकृतपणे लॉन्च केला आहे. कंपनीने स्टँडर्ड मॉडेलसोबत नथिंग फोन (4बी) आरसीबी एडिशन देखील सादर केले असून, हे विशेष एडिशन बेंगळुरू येथील नथिंगच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये मर्यादित प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहे. तर स्टँडर्ड मॉडेलची विक्री 14 जुलैपासून फ्लिपकार्ट तसेच क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि विजय सेल्ससारख्या ऑफलाइन स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट या तीन रंगांमध्ये ग्राहकांना उपलब्ध होईल.

भारतात नथिंग फोन (4बी)च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी 38,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीकडून बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसची ऑफरही देण्यात येत आहे.

नथिंग फोन (4बी)मध्ये 6.77 इंचाचा फुल एचडी+ सॅमसंग सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, तो 120Hz रिफ्रेश रेट, 2000 निट्स पीक ब्राइटनेस आणि AGC DT-Star 2 प्रोटेक्शनसह येतो. हा स्मार्टफोन Android 16 आधारित Nothing OS 4.1 वर चालतो. कंपनीने तीन वर्षे Android OS अपडेट्स आणि सहा वर्षे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. फोनला IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स रेटिंगही मिळाली आहे.

परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये 4nm तंत्रज्ञानावर आधारित Qualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर, Adreno 810 GPU, Qualcomm AI इंजिन, 8 जीबी LPDDR4x रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. दीर्घकाळ गेमिंग आणि वापरादरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी मोठे व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टिमही देण्यात आले आहे.

नथिंगची खास ओळख असलेला Glyph इंटरफेस या फोनमध्येही कायम ठेवण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस 45 मिनी एलईडी लाइट्स असून, त्याद्वारे नोटिफिकेशन्स, टाइमर, व्हॉल्यूम इंडिकेटर, लाईव्ह अपडेट्स, फ्लिप टू ग्लिफ आणि फ्लिप टू रेकॉर्डसारखी विविध स्मार्ट फीचर्स वापरता येतात.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा OIS आणि EIS सपोर्ट असलेला मुख्य कॅमेरा तसेच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असून, 4K 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा मिळते. स्मार्टफोनमध्ये 6,000mAh क्षमतेची बॅटरी असून ती 33W फास्ट चार्जिंग आणि 7.5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 80 मिनिटे लागतात. 5G, Wi-Fi 6, Bluetooth 6.0, USB Type-C, GPS आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये आकर्षक डिझाइन, दमदार फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ग्राहकांसाठी एक प्रभावी पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande