आवश्यक सुविधा देऊन बीडच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा द्या! — पालकमंत्री सुनेत्रा पवार
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थ
Q


बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी व युवकांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

नवोदित खेळाडूंना उत्तम सुविधा, सरावासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सुरू असलेली विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande