माधुरी दीक्षित म्हणतेय खेळात सहभागी व्हा; 'कोण होणार करोडपती’साठी नोंदणी सुरू
मुंबई, 15 ऑगस्ट (हिं.स.)। दररोजची सुरुवातच अनेक प्रश्नांनी होते – कधी, कुठे, केव्हा, कसं, कोण आणि का? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असू शकतात; मात्र त्यांची उत्तरं शोधण्याची उत्सुकता आपल्याला कायम पुढे नेत असते. याच विचाराला पुढे नेत, सो
माधुरी दीक्षित म्हणतेय, ‘या, खेळाचा भाग व्हा!’ ‘कोण होणार करोडपती’साठी नोंदणी सुरू


मुंबई, 15 ऑगस्ट (हिं.स.)। दररोजची सुरुवातच अनेक प्रश्नांनी होते – कधी, कुठे, केव्हा, कसं, कोण आणि का? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असू शकतात; मात्र त्यांची उत्तरं शोधण्याची उत्सुकता आपल्याला कायम पुढे नेत असते. याच विचाराला पुढे नेत, सोनी मराठी वाहिनीने ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी पर्वासाठी आजपासून नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना आपल्या ज्ञानाची कसोटी पाहण्याची आणि या रोमांचक खेळाचा भाग होण्याची संधी आता मिळणार आहे.

या पर्वासाठी प्रेक्षक Sony LIV ॲपद्वारे किंवा +918591975331 या नंबर वरून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात. ज्ञानाच्या जोरावर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटपर्यंत पोहोचण्याची ही संधी प्रेक्षकांसाठी खुली झाली आहे.

‘आता खेळ बदलणार’ या घोषवाक्यासह ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व ज्ञान, जिज्ञासा आणि महत्त्वाकांक्षेचा नवा अनुभव घेऊन येणार आहे. माधुरी दीक्षित यांच्या सूत्रसंचालनाने सजलेल्या या पर्वात प्रेक्षकांना आपल्या ज्ञानाची ताकद आजमावण्याची, योग्य उत्तरांच्या जोरावर खेळ पुढे नेण्याची आणि हॉट सीटवर विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande