लातूर - तिर्रट जुगार अड्ड्यावरील कारवाईत १० जुगारी ताब्यात; ५.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ चे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अक्षय पाटील यांनी हिप्पळगाव शेतशिवारात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १० जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक
पोलीस कारवाई


लातूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ चे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अक्षय पाटील यांनी हिप्पळगाव शेतशिवारात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १० जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व मोटारसायकली असा एकूण ५,०३,१००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता, मौजे हिप्पळगाव ते सुगाव जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिम बाजूस, हिप्पळगाव शेतशिवारातील संतोष तुकाराम पेदाटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी कारवाई केली.

या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे.

१) कृष्णा पांडुरंग मुडे, वय ३५ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

२) मुक्तार महमद शेख, वय ४३ वर्षे, रा. हिप्पळगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर.

३)सोपान केरबा तावरे, वय ३० वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

४) संतोष तुकाराम पेदाटे, वय ४२ वर्षे, रा. हिप्पळगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर.

५) गणेश पंढरी गुणाले, वय ३८ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

६)शरद गोविंद धोतरे, वय ४३ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

७) अनिल अशोक धोतरे, वय ४४ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

८)प्रल्हाद बाबुराव शिंदे, वय ३८ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

९)रमजान काशीम पठाण, वय ३५ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

१०)विजयकुमार विठ्ठल बरकते, वय ४७ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

असे असून पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, तसेच मोबाईल फोन व मोटारसायकली असा एकूण ५,०३,१००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात शिरूर अनंतपाळ येथील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अक्षय जाधव यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.बेकायदेशीर जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अशा अवैध प्रकारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande