छ. संभाजीनगर - पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ३४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या मोठ्या कामगिरीने यशाची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड,३४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
छ. संभाजीनगर - पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ३४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या मोठ्या कामगिरीने यशाची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड,३४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

प्राप्त माहितीनुसार, वैजापूर पोलिसांनी एका लॉजमधील अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून १७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. जुना नागपूर-मुंबई रोडवरील लॉजमध्ये पत्त्यांवर पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान २१ हजार ३७० रुपये रोख, १२ मोबाईल, ८ दुचाकी आणि २ चारचाकी वाहने असा एकूण ३४ लाख ७० हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी लॉजमालक यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande