
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कधीकाळी यूपीआयची खिल्ली उडवली होती, मात्र आज त्याची आकडेवारी संपूर्ण जगासमोर आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी कदाचित या उपलब्धी समजून घेऊ शकणार नाहीत.
संबित पात्रा म्हणाले, आज यूपीआयने १० वर्षे पूर्ण केली असून ते जगातील सर्वात मोठे रिअल-टाइम पेमेंट सिस्टम बनले आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांपूर्वी जेव्हा यूपीआयची संकल्पना मांडली होती, तेव्हा काँग्रेस नेत्यांनी त्याची खिल्ली उडवली होती, मात्र आज हीच प्रणाली डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील भारताची सर्वात मोठी यशोगाथा ठरली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशासमोर ‘सप्तधारा’चे व्हिजन मांडले होते. हा विकसित भारताच्या निर्मितीचा रोडमॅप आहे. कोणत्याही देशाला पुढे नेण्यासाठी स्पष्ट उद्दिष्टाची आवश्यकता असते आणि योग्य वेळी योग्य नेतृत्व हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालते. त्यांनी सांगितले की, ‘सप्तधारा’अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग पॉवर, कृषी आणि फूड प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, ग्रीन आणि ब्लू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर, गती शक्ती आणि संरक्षण शक्ती या सात प्रमुख क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
ते म्हणाले की, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मजबूत देशांतर्गत व्हॅल्यू चेन, झिरो-डिफेक्ट आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषी क्षेत्रात डाळी-तेलबिया उत्पादन, सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांना स्वस्त खत उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम केले जात आहे. पात्रा यांनी सांगितले की, भारत स्पेस, क्वांटम टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डेटा सेंटर यांसारख्या क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे. त्यांनी यूपीआयला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करताना सांगितले की, ते जगातील सर्वात मोठे रिअल-टाइम पेमेंट सिस्टम बनले आहे.
ते म्हणाले की, ग्रीन आणि ब्लू इकॉनॉमी, योग, आयुर्वेद, सांस्कृतिक पर्यटन, सिनेमा, व्हीएफएक्स आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांच्या माध्यमातून भारताची जागतिक ओळख मजबूत होत आहे. तसेच हाय-स्पीड रेल्वे, आधुनिक महामार्ग, इनलँड वॉटरवेज आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या विस्ताराच्या माध्यमातून विकसित भारताच्या उद्दिष्टाला गती दिली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule