तरुणांना बेरोजगारीकडे ढकलल्याचा काँग्रेसचा केंद्र सरकारवर आरोप
नवी दिल्ली, २५ ऑगस्ट (हिं.स.) बेरोजगारीवरील नीती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर तरुणांना बेरोजगारीकडे ढकलल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशातील ८७ दशलक्ष तरुण बेरोजगार आहेत आणि त्यापैक
के. सी. वेणुगोपाल यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, २५ ऑगस्ट (हिं.स.) बेरोजगारीवरील नीती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर तरुणांना बेरोजगारीकडे ढकलल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशातील ८७ दशलक्ष तरुण बेरोजगार आहेत आणि त्यापैकी केवळ ८.२५ टक्के लोकांकडेच रोजगारक्षम कौशल्ये आहेत.

वेणुगोपाल यांनी मंगळवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, हे अमृतकाळाचे वास्तव आहे, जे राहुल गांधींच्या विद्यार्थी आवाहनातून समोर येत आहे. यामुळेच काँग्रेसच्या प्रयत्नांना व्यापक जनसमर्थन मिळत आहे. त्यांनी आरोप केला की, सरकारने २०१४ नंतर 'अच्छे दिन' (चांगले दिवस) देण्याचे आश्वासन दिले होते, पण तरुणांची फसवणूक करून देशाच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचे (लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे) डेमोग्राफिक क्रायसिसमध्ये (लोकसंख्याशास्त्रीय संकटात) रूपांतर केले आहे. वेणुगोपाल म्हणाले की, सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. याला तरुणांविरोधी धोरण संबोधत ते म्हणाले की, काँग्रेस एक असे जनआंदोलन तयार करत आहे, ज्यामुळे सरकारचे पतन होईल.-------------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande