तेलंगणामध्ये बस आणि ट्रकची धडक, 6 ठार
हैदराबाद, २६ ऑगस्ट (हिं.स.) : तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यात हैदराबादहून एलुरुला जाणाऱ्या खाजगी बसचा कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला आहे. लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनर ट्रकला एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने मागून धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्य
तेलंगणा अपघात


तेलंगणा अपघात


हैदराबाद, २६ ऑगस्ट (हिं.स.) : तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यात हैदराबादहून एलुरुला जाणाऱ्या खाजगी बसचा कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला आहे. लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनर ट्रकला एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने मागून धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. कंटेनरमधील लोखंडी सळ्या बसमध्ये घुसल्याने अपघाताची भीषणता वाढली.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सुमारे 5:15 वाजता हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर कोडाड मंडळात झाला. इलेक्ट्रिक बसने मागून ट्रकला धडक दिली. बस धडकण्यापूर्वी ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याचीही शक्यता आहे. अपघात झाला, त्यावेळी बसमध्ये 42 प्रवासी होते. पोलिसांनी सांगितले की, ट्रकमध्ये लोखंडी जड खांब भरलेले होते. बस ट्रकला धडकताच खांबांना बांधून ठेवणारी साखळी तुटली. त्यानंतर खांब बसच्या उजव्या बाजूला घुसले. बसमध्ये अडकलेले प्रवासी विव्हळत होते. पोलिसांनी तासभर चाललेल्या बचावकार्यानंतर जखमी प्रवाशांना बाहेर काढले. परिणामी काही वेळासाठी हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बस कंटनेरला धडकताच आतमधील प्रवाशांचा किंकाळ्याचा एकच आवाज ऐकू आला. बसच्या आत अडकलेले प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande