सोलापूरमधील विडी उद्योग स्थलांतरित अथवा बंद होणार नाही; उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। विडी कामगारांना शासन परिपत्रकानुसार किमान वेतन देण्याच्या अनुषंगाने तसेच विडी उद्योगासमोर निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोलापूरमधील विडी उद्योग
सोलापूरमधील विडी उद्योग स्थलांतरित अथवा बंद होणार नाही; उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद


सोलापूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। विडी कामगारांना शासन परिपत्रकानुसार किमान वेतन देण्याच्या अनुषंगाने तसेच विडी उद्योगासमोर निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोलापूरमधील विडी उद्योग जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होऊ नयेत किंवा बंद पडू नयेत, यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला विडी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर तसेच विविध विडी कारखानदार उपस्थित होते.

किमान वेतनाच्या अंमलबजावणीसंदर्भात उद्योजकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे सादर कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कामगार संघटनांकडूनही त्यांच्या मागण्या व निवेदने स्वीकारण्यात येणार असून, दोन्ही पक्षांची भूमिका शासन दरबारी योग्य पद्धतीने मांडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त अभय गीते यांनी हे प्रकरण सकारात्मक आणि योग्य मार्गाने सोडविण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन केले. बैठकीत विडी कारखानदारांच्या विविध अडचणीही जाणून घेण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande