हिरव्या मिरचीचे भाव गडगडले
अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)। समतोल व रोगराईमुक्त वातावरणामुळे उत्पादन व आवक वाढल्याचा परिणाम नगदी उत्पन्न देणाऱ्या इतर पिकांच्या तुलनेत हिरव्या मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, मागील वर्षी प्रति क्विंटल चार ते साडेचार हजार
हिरव्या मिरचीचे भाव गडगडले


अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

समतोल व रोगराईमुक्त वातावरणामुळे उत्पादन व आवक वाढल्याचा परिणाम

नगदी उत्पन्न देणाऱ्या इतर पिकांच्या तुलनेत हिरव्या मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, मागील वर्षी प्रति क्विंटल चार ते साडेचार हजार रुपये दर मिळालेल्या हिरव्या मिरचीचे भाव यंदा अर्ध्यावर आले आहेत. समतोल व रोगराईमुक्त वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली असून बाजारपेठेतील आवक वाढल्याचा परिणाम मिरचीच्या दरावर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी पथ्रोट परिसरातील सुमारे पाच टक्के शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. एकरी सुमारे ५५ हजार रुपये खर्च करून जून महिन्यात मिरचीची लागवड केली जाते. लागवडीनंतर साधारणतः ७० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उत्पादन सुरू होते. सध्या एकरी सुमारे २० क्विंटलपर्यंत मिरचीचे उत्पादन मिळत असून, प्रति क्विंटल सुमारे २, ८०० रुपये दर मिळत आहे. मागील वर्षी मिरचीला चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने मिरची पिकावर रोगराईचा प्रभाव कमी असून उत्पादनात वाढ झाली आहे. पथ्रोट परिसरात यंदा केवळ एक टक्क्याच्या आसपास शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, बुलडाणा व नंदूरबारसारख्या भागांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन होत असून ते बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे बाजारातील आवक वाढून मिरचीच्या दरात घसरण झाली आहे. मिरची पिकाला योग्य वेळी खत देणे, आवश्यकतेनुसार औषधांची फवारणी करणे आणि पिकाची योग्य निगा राखणे आवश्यक असते. योग्य काळजी घेतल्यास पिकाला वारंवार मिरची लागण्याचे प्रमाण कायम राहते. एकसारखे उत्पादन मिळत असताना बाजारपेठेतील आवक व दर निश्चितीचा विचार करून काही शेतकरी हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरवात करतात. लाल मिरचीला मागणीनुसार चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळतो. दैनंदिन खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचे महत्त्वाचे स्थान असल्याने बाजारपेठेत तिची मागणी कायम असते. स्थानिक शेतकरी आता मसाला पिकांच्या उत्पादनाकडे वळत असून कडधान्य व इतर पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक उत्पादन व चांगला नफा मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी या उत्पादनातून समाधानी असल्याचे चित्र आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande