रत्नागिरी : आंतरशालेय मॅरेथॉनला लांज्यात प्रतिसाद
रत्नागिरी, 30 ऑगस्ट (हिं.स.) । पाली येथील श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचालित लांजा येथील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित लांजा तालुका आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा आज मोठ्या उत्स
लांजा आंतरशालेय मॅरेथॉन


रत्नागिरी, 30 ऑगस्ट (हिं.स.) । पाली येथील श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचालित लांजा येथील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित लांजा तालुका आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली. तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संस्थेचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योजक रवींद्र सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, पुढील वर्षीची मॅरेथॉन लांजावासीयांची महाराष्ट्रातील मोठी स्पर्धा असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

स्पर्धेत १२ वर्षे, १४ वर्षे आणि १६ वर्षे वयोगटानुसार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक गटात पहिल्या पाच विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी लांज्याच्या नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande