सोलापूर : टी.पी. स्कीम ४ मधील बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा; पीआर कार्ड अथवा मिळकतपत्रिका बंधनकारक
सोलापूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। टी.पी. स्कीम क्रमांक ४ मधील भूखंडासाठी बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर करताना नगर भूमापन विभागाचे प्रॉपर्टी रजिस्टर (पीआर) कार्ड अथवा मिळकतपत्रिका सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टी.पी. स्कीम ४ मधील म
smc


सोलापूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

टी.पी. स्कीम क्रमांक ४ मधील भूखंडासाठी बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर करताना नगर भूमापन विभागाचे प्रॉपर्टी रजिस्टर (पीआर) कार्ड अथवा मिळकतपत्रिका सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टी.पी. स्कीम ४ मधील मिळकतदारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.टी.पी. स्कीम क्रमांक ४ मधील सात-बारा उताऱ्यांमुळे प्राथमिक व अंतिम रेखांकन, विभागणी-अमलगमेशन आणि बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी क्रेडाई असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित रेखांकनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मगर, नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ यांच्यासह महापालिका आणि क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

टी.पी. स्कीम क्रमांक ४ मधील एफपी आणि ओपी वॉर्डनुसार अंतिम झालेल्या ले-आऊटमधील मिळकतपत्रिका नगर भूमापन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, नगर भूमापन विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मोजणीच्या आधारे नगररचना विभागाने सात-बारा नोंदीनुसार प्राथमिक व अंतिम ले-आऊट तसेच अमलगमेशन अथवा विभागणीच्या प्रस्तावांवर कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.या निर्णयामुळे टी.पी. स्कीम क्रमांक ४ मधील भूखंडांच्या रेखांकनासह बांधकाम परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande