आरबीआयने किरकोळ महागाई दराचा अंदाज कमी करून केला 5 टक्के
जीडीपी वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज वाढवून 6.7 टक्के आणि किरकोळ महागाई दराचा अंदाज कमी करून पा
RBI Lowers Retail Inflation Forecast 5%; Raises GDP Growth Projection to 6.7%


जीडीपी वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज वाढवून 6.7 टक्के आणि किरकोळ महागाई दराचा अंदाज कमी करून पाच टक्के केला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) च्या तीन दिवसीय द्वैमासिक आढावा बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, चलनविषयक आढाव्यात एकमताने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये वास्तविक जीडीपी विकास दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीत सात टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.4 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.8 टक्के वाढीचा अंदाज आहे. दोन्ही बाजूंनी चढ-उताराचे धोके संतुलित आहेत.

आरबीआय गव्हर्नर यांनी चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या तिसऱ्या द्वैमासिक चलनविषयक धोरणाची घोषणा करताना सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या अस्थिरतेचा देशांतर्गत आर्थिक घडामोडींवरही काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मल्होत्रा यांनी सांगितले की, जागतिक अनिश्चितता असूनही चालू आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-जून) पहिल्या तिमाहीतील प्रमुख आकडे देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील मजबुती दर्शवतात.

त्यांनी सांगितले की, भू-राजकीय घडामोडींमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उताराची स्थिती कायम आहे, त्यामुळे नजीकच्या काळातील परिस्थितीबाबतही अनिश्चितता आहे. मल्होत्रा यांनी सांगितले की, आतापर्यंत महागाईचा सामान्य दबाव कमी आहे, परंतु अन्नपदार्थ, इंधन आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने व्यापक स्तरावर महागाई वाढण्याचा धोका कायम आहे.

संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2026-27 साठी ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईचा अंदाज 5 टक्के ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीत ती 4.7 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 5.9 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गव्हर्नर यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्ष 2027-28 च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई दोन्ही बाजूंनी चढ-उतारासह 5.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2026-27 साठी मुख्य महागाई 4.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने अपेक्षेप्रमाणे प्रमुख धोरणात्मक दर रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयने जून महिन्यातील चलनविषयक धोरण आढाव्यात चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी जीडीपी विकास दराचा अंदाज 6.6 टक्के आणि महागाई दराचा अंदाज 5.1 टक्के ठेवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande