
अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
अकोला जिल्हा मन्नेवार समाज विकास परिषदेच्या वतीने वार्षिक आषाढी पूजन कार्यक्रम मालीपुरा येथील दंडू मरमा माता मंदिरात साधेपणाने व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला समाजातील महिला-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नवनियुक्त अध्यक्ष संजय पापाया चनकेशला यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात समाजबांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. सर्वांनी एकजुटीने आषाढी पूजनात सहभागी होत समाजाची प्रगती, एकता आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष रामदास शुल्काजी बाबा नेहरे गंगाधरे, महिला मंडळ अध्यक्षा मोहिनी नेहरे, आरती तग्रेकर, सुनीता कल्ले, बिंदू पुन्नल, पूनम एडले, आशा चनकेशला यांच्यासह समाजबांधव तसेच आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे