अकोला - वाडेगावमध्ये ११ ऑगस्टला पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
अकोला, 07 ऑगस्ट, (हिं.स.)। नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अकोल्यात रोजगार मेळाव्
अकोला - वाडेगावमध्ये ११ ऑगस्टला पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


अकोला, 07 ऑगस्ट, (हिं.स.)। नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अकोल्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला आणि श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ऑगस्ट, २०२६ रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या ९१ वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांकरिता प्रिसीजन मॅपिग जिआयएस प्रा.लि. अमरावती -१०, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड, अकोला-३०, गुजरात अंबुजा एक्सपोर्टसा लि. ता. बाळापूर, जि. अकोला-१०, बी.व्ही. जी. इंडीया लि.पुणे-३२, जागेश्वर विद्यालय व वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला-६, (मुख्यमंत्री यु. का. प्र. योजनेतंर्गत) अंजुमन अन्वारुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा, बाळापूर, जि. अकोला-३ (मुख्यमंत्री यु. का. प्र. योजनेतंर्गत) ई. आस्थापना / कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहत असून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेवून पात्र ठरणा-या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी १) www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर भेट दया. २) एम्प्लॉईमेंट या टॅबवर क्लिक करा. ३) जॉब सीकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी/आधार कार्ड क्र. व पासवर्ड साईन इन करा. ४) आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडा. ५) डिस्ट्रिक्ट मध्ये अकोला जिल्हा निवडून फील्टर बटनबर क्लिक करावे. नंतर सदर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या अॅक्शन बटनच्या खाली वा व अप्लाय बटन दिसेल. ६) तदनंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल, आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय अॅग्री हा पर्याय निवडा. ७) शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

आपली रजिस्ट्रेशन स्लिप ची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित रहावे, याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक (०७२४) - २४३३८४९ किंवा Email- akolarojgar@gmall.com यावर संपर्क करावा तसेच दि. ११ ऑगस्ट, २०२६ रोजी, श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रासंह प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रफुल्ल सु. शेळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande