
छत्रपती संभाजीनगर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या आनंदात बेगमपुरा पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली. चोरी, फसवणूक आणि हरवलेले तब्बल ३५ मोबाईल पोलिसांनी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, पंजाब, कर्नाटक, झारखंड आणि उत्तर प्रदेशातून हस्तगत केले. घाटी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांचे हरवलेले मोबाईलही पोलिसांनी शोधून काढले. महिला, वृद्ध, युवक आणि पुरुषांना हे मोबाईल अधिकाऱ्यांच्या हस्ते परत करण्यात आले. हातात पुन्हा आपला मोबाईल येताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविणा यादव व पथकाने ही कामगिरी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis