नांदेड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील नांदेड येथे गुरूवारी झालेल्या दुर्घटनेत नागरिकांचा मृत्यू झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमी
PM Expresses Grief Loss Life Due Boat Capsizing Jabalpur MP


नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्रातील नांदेड येथे गुरूवारी झालेल्या दुर्घटनेत नागरिकांचा मृत्यू झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून (पीएमएनआरएफ) २ लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. नांदेडच्या भोकरधन येथे गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आज, शुक्रवारी

पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. “महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेत नागरिकांचा मृत्यू झाल्याने दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी व्यक्तींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि जखमींना उपचारासाठी मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande