धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल
बीड, १५ सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात डॉक्
धनंजय मुंडे


बीड, १५ सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंडे यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर आणि अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande