मोर्शीत १९-२० सप्टेंबरला तिसरे महानुभाव साहित्य संमेलन
अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्र, विदर्भ साहित्य संघ, शाखा रिध्दपूर, श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी सोहळा समिती, मोर्शी आणि भारतीय विद्या मंदिर संचालित भारतीय महाविद्यालय, मोर्शी यांच्या संयु
मोर्शी येथे 19 व 20 सप्टेंबर रोजी तिसरे महानुभाव साहित्य संमेलन


अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्र, विदर्भ साहित्य संघ, शाखा रिध्दपूर, श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी सोहळा समिती, मोर्शी आणि भारतीय विद्या मंदिर संचालित भारतीय महाविद्यालय, मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी शहरातील परशूराम पॅलेस येथे 19 व 20 सप्टेंबर, 2026 दोन दिवसीय तिसरे महानुभाव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय महानुभाव साहित्य संमेलनामध्ये वैचारिक परिसंवादासह विविध उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.

संमेलनाची सुरुवात शनिवार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8:00 वाजता भव्य ग्रंथदिंडीने होईल. श्रीकृष्ण मंदिर, धांडे ले - आऊट परिसर येथून निघून ही दिंडी संमेलनस्थळी पोहोचेल. त्यानंतर सकाळी 10:00 वाजता पहिल्या सत्रात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते संमेलनाचे रितसर उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून सर्वज्ञ विद्यापीठ, माळवाडगांव, जि. अहिल्यानगर येथील कुलगुरू आचार्य महंत श्रीहंसराजदादा खामणीकर, प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी म. श्री. हर्षीकरबाबा शेवलीकर (कुसळंब, जि. सोलापूर), नगरचौकी, मनमाड येथील श्री. विजयराज पंजाबी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

दुस-या सत्रात 'महानुभाव पंथाचे वर्तमानकालीन सृजनात्मक साहित्य' या विषयावर परिसंवाद होणार असून मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तिस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील कवी, लेखक, पत्रकार बळवंत भोयर अध्यक्षस्थानी राहतील. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता चवथ्या सत्रात मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर यांची प्रकट मुलाखत, त्यानंतर 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत महानुभाव पंथाचे योगदान' या विषयावर दुस-या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी मराठी भाषा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे राहतील.

समारोप सोहळा रविवारी

रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3:00 वाजता संमेलनाचा समारोप होईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू आचार्य महंत श्रीहंसराज दादा खामणीकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विद्यापीठ अधिसभा सदस्य अॅड. अमोल ठाकरे, आचार्य पाचराऊतबाबा, डॉ. आण्णा वैद्य, प्रशांत भागवतकर, अनंत सोमवंशी, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर उपस्थित राहणार आहेत.दोन दिवस चालणा-या या वाड्.मयीन व सांस्कृतिक सोहळ्याला साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व आयोजन समितीने केले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande