
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील विविध गणेश विसर्जन स्थळांची महापौर कविता संतोष मुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.आसना नदी, पुयनी खदान, जरी खदान, नाव घाट तसेच पासदगाव येथील विसर्जन स्थळांची पाहणी यावेळी करण्यात आली.
गणेशभक्तांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था तसेच विसर्जनाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीवेळी उपमहापौर दीपकसिंह काशिनाथसिंह रावत, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह संबंधित झोनचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis