जळगावात कापूस खरेदीला सुरुवात ; पहिल्याच दिवशी कापसाला ८,५५३ रुपये भाव
जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणगाव येथे पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ८,५५३ रुपये
जळगावात कापूस खरेदीला सुरुवात ; पहिल्याच दिवशी कापसाला ८,५५३ रुपये भाव


जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणगाव येथे पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ८,५५३ रुपये प्रतिक्विंटल, तर पारोळा तालुक्यातील करमाड येथे ८,३५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

धरणगावात ८,५५३ रुपयांचा भाव

धरणगाव येथील श्रीजी जिनिंग येथे काटा पूजन करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळाल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, डी. आर. पाटील, बाळासाहेब चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी. सी. पाटील, उद्योजक भगवान महाजन, बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, संचालक सुरेश चौधरी, जीवनसिंह बयस, नयन गुजराथी, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, भानुदास विसावे आणि पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

करमाडमध्ये ८,३५१ रुपयांचा दर

पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथेही कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या संचालक बबिता पाटील यांचे पती संभाजी जिभाऊ पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. यावेळी कापसाला ८,३५१ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला.

प्रारंभी गावातील शेतकरी प्रवीण जुलाल पाटील, जिभाऊ धनराज पाटील, वसंत साहेबराव पाटील, परमेश्वर मुकुंदा पाटील आणि गणेश ठाकूर यांच्या कापसाची मोजणी करून खरेदी करण्यात आली.

सणासुदीच्या काळात कापसाला हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळातही कापसाला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande