
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
नांदेड शहरास ऐतिहासिक, सांस्कृतिक, व्यापार आणि राजकीय क्षेत्र असा अमूल्य वारसा लाभलेला आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर मराठवाड्यात नांदेड हाच दुसर्या क्रमांकाचा मोठा जिल्हा असल्याने नांदेड शहरात ग्रामीण भागातून कामानिमित्त येणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या संख्येने खुप मोठी आहे.
एसटी बसने गावांकडे ये-जा करणा-या प्रवाशांसाठी शहराच्या मध्य भागावात असलेले मध्यवर्ती बस स्थानक हे मात्र अनेक समस्यांच्या अजगरी विळख्यात सापडल्याचे सध्या चित्र आहे.
याविषयी एसटी विभाग नियंत्रकांना पत्र लिहून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. स्वच्छतागृहे- बसस्थानकातील प्रवाशांसाठी असलेले स्वच्छतागृहांमध्ये वापराचे पाण्याची नियमित व पुरेशी उपलब्धता, स्वच्छतागृहांची दररोज स्वच्छता असावी. तसेच रात्री पुरेशी उजेड व्यवस्था हवी. पिण्याचे शुद्ध पाणी - बसस्थानकात असलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना अधिका-यांना देत प्रवशांचे होणारे हाल, हेळसांड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis