माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंधू अधिकराव चव्हाण यांचे निधन
सातारा, 15 सप्टेंबर (हिं.स.) - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे चुलत बंधू कै. अधिकराव अण्णासाहेब चव्हाण यांचे सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कै. अधिकराव चव्हाण यांच्यावर कराड येथी
अधिकराव चव्हाण


सातारा, 15 सप्टेंबर (हिं.स.) - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे चुलत बंधू कै. अधिकराव अण्णासाहेब चव्हाण यांचे सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. अधिकराव चव्हाण यांच्यावर कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.

कै. अधिकराव चव्हाण यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, कराड येथे होणार आहे. या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande