सौंसरजवळ भीषण अपघात ; चालकाचा मृत्यू, चार महिला गंभीर
भंडारा, 16 सप्टेंबर (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला आज, बुधवारी सौंसर तालुक्यातील तीनखेडा येथे भीषण अपघात झाला. यात वाहनचालकाचा मृत्यू झाला असून 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण भंडारा त
अपघात लोगो


भंडारा, 16 सप्टेंबर (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला आज, बुधवारी सौंसर तालुक्यातील तीनखेडा येथे भीषण अपघात झाला. यात वाहनचालकाचा मृत्यू झाला असून 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण भंडारा तालुक्यातील जवाहरनगर इथल्या सावरी गावचे रहिवासी आहेत.

या अपघातात कारचा दर्शनी भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला असून कार चालक आदित्य सुनील मांढरे (वय २४) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर वाहनातील मंगला ठवकर, रेणा चौधरी, जयश्री झंझाळ आणि शिला तितीरमारे या चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण ७ ते ८ महिला प्रवास करत असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या महिलांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमी महिलांना तातडीने सौंसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.देवदर्शनाहून परतताना झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे सावरी गावासह भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सौंसर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande