
बीड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिवाचीवाडी ता. केज येथील रामकिशन उर्फ अण्णा चौरे वय (३८ वर्ष) हे शेतात काम करीत असताना अचानक विजेच्या वायरचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. घटने नंतर त्यांना तातडीने विडा येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्या नंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर विडा येथील दवाखान्यात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
मयत रामकिशन उर्फ अण्णा लक्ष्मण चौरे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन बहीनी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.या प्रकरणी विडा बीटचे अंमलदार उमेश आघाव पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis