रत्नागिरी : नमनाहून परतणाऱ्या टेम्पोला अणुस्कुरा घाटात अपघात
रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोचे (क्र. एमएच ०४ सीयू ०५६६) ब्रेक निकामी झाल्याने तो घाटातील मार्गावरच उलटला. सुदैवाने या अपघ
अणुस्कुरा घाटात उलटलेला टेम्पो


रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोचे (क्र. एमएच ०४ सीयू ०५६६) ब्रेक निकामी झाल्याने तो घाटातील मार्गावरच उलटला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

या टेम्पोतून कलाकार मंडळी कोल्हापूर व पन्हाळा येथे नमन कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून ही मंडळी अणुस्कुरा घाटमार्गे परतत असताना घाटात टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो मार्गावरच उलटला. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने सर्व कलाकार सुरक्षित राहिले.

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण पोलीस दूरक्षेत्र तसेच अणुस्कुरा चौकीवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनामुळे घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande