
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.)सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेत अन्यायाविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या प्रखर लेखणीने व कृतीने आवाज उठविणारे धडाडीचे समाजसुधारक, क्रांतिकारक लेखक व पत्रकार केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यापीठातील सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या अभिवादन प्रसंगी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. विजय खरे, अधिष्ठाता प्रा. डॉ. रावसाहेब लटपटे, संचालक व विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांच्यासह विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु