नकुलेश्वर सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी-शेतमजूर विकास गटाचा ११ जागांवर विजय
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नकुलेश्वर शेतकरी शेतमजूर विकास गटाने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळविला. विजयानंतर नवनिर्वाचित संचालकांनी माजी मंत
निवड


लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नकुलेश्वर शेतकरी शेतमजूर विकास गटाने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळविला. विजयानंतर नवनिर्वाचित संचालकांनी माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख आणि माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

बोरगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांमध्ये अटीतटीची चुरस झाली. सभासदांनी नकुलेश्वर शेतकरी शेतमजूर विकास गटाच्या बाजूने कौल दिला. या गटाचे ११ संचालक निवडून आले, तर प्रतिस्पर्धी गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

विजयी गटाकडून गुणवंत जाधव, गुणवंत बागल, सौदागर वगरे, शेषेराव पाटील, मिठू उत्केकर, सुरेश माने, परमेश्वर बनसोडे, शिवनंदाप्पा सुतार, सोमनाथ उबाळे, कविता साळुंके आणि भागीरथीबाई यांची संचालकपदी निवड झाली.

निवडणुकीदरम्यान विजयी गटाच्या समर्थनार्थ उपसरपंच सतीश शिंदे, ज्ञानोबा जयवंतराव साळुंके, गणपत डामगिरे, कल्याण साळुंके, बंटी साळुंके, विश्वभर पाटील, रणजीत साळुंके, चंद्रशेखर पाटील, युवराज साळुंके आणि शिवकुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande