
नाशिक, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर नाशिक रोड वरील सातपूर गावाच्या पुढे खाजगी महाविद्यालयाच्या बसने दुचाकी ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सातपूर परिसरामध्ये दोन दिवसांमध्ये अपघाताचा हा दुसरा बळी असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की नाशिक शहरात विविध भागांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये काम सुरू आहेत असेच काम नाशिक त्रंबकेश्वर रोडवरील सातपूर गावाच्या पुढे असलेल्या हॉटेल शौर्य वाडा समोर सुरू आहे या ठिकाणी कामाची माती ही रस्त्यावरती आलेली होती आणि त्या ठिकाणी वाहन नियंत्रित करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असताना ही दुर्दैवी घटना घडली काल मंगळवारी दुपारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे नाशिक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते सातपूर या परिसरामध्ये कामानिमित्त गेले असताना दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना घडली असताना लागोपाठ दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे.
याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सतपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्य वडा या परिसरामध्ये दुचाकी क्रमांक एम एच 15 जीजी 18 92 ही जात असताना या ठिकाणी मातीमुळे दुचाकी स्लिप झाली आणि पाठीमागून येणाऱ्या संदीप फाऊंडेशन या खाजगी महाविद्यालयाची बस क्रमांक एम एच 15 एचएच 60 71 या बसने धडक दिल्यामुळे पाठीमागे बसलेली महिला प्रतीक्षा आचारी - इंफाळे तिच्या अंगावरून बस गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सर्वप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI