एलिवेट कॅम्पसेसचा आयपीओ सब्स्क्रिप्शनसाठी खुला, २५ सप्टेंबरपर्यंत लावता येणार बोली
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.)। शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनी एलिवेट कॅम्पसेस लिमिटेडचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ आज सब्स्क्रिप्शनसाठी लाँच करण्यात आला. या आयपीओमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. इश्यू
New IPO Elevate Campuses


नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.)। शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनी एलिवेट कॅम्पसेस लिमिटेडचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ आज सब्स्क्रिप्शनसाठी लाँच करण्यात आला. या आयपीओमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. इश्यूची क्लोजिंग झाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी शेअर्सचे अलॉटमेंट केले जाईल, तर २९ सप्टेंबर रोजी अलॉट झालेले शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातील. कंपनीचे शेअर्स ३० सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. लाँचिंगनंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत या आयपीओला ११ टक्के सब्स्क्रिप्शन मिळाले होते.

या आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी ३४३ रुपयांपासून ३६२ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज ४१ शेअर्सचा आहे. या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स किमान एक लॉट म्हणजेच ४१ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. त्यासाठी त्यांना १४,८४२ रुपये गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे रिटेल इन्व्हेस्टर १,९२,९४६ रुपये गुंतवून जास्तीत जास्त १३ लॉटमध्ये ५३३ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. या आयपीओअंतर्गत एक रुपया फेस व्हॅल्यू असलेले एकूण ५,८०,११,०४९ नवीन शेअर्स जारी केले जात आहेत.

या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजेच क्यूआयबींसाठी ७५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी १० टक्के हिस्सा आणि नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच एनआयआयसाठी १५ टक्के हिस्सा राखीव आहे. या इश्यूसाठी जेएम फायनान्शियल लिमिटेडला बुक रनिंग लीड मॅनेजर बनवण्यात आले आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला रजिस्ट्रार बनवण्यात आले आहे.

एलिवेट कॅम्पसेसच्या आर्थिक स्थितीबाबत सेबीकडे जमा करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच आरएचपीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, कंपनीची आर्थिक स्थिती सातत्याने मजबूत झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ३९.६९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. हा नफा पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वाढून ४९.७४ कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीला १७३.७६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला.

याच कालावधीत कंपनीच्या महसुलातही वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ३६२.६१ कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला होता. हा महसूल आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वाढून ३९४.१३ कोटी रुपयांवर पोहोचला. तर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीला ६०३.३९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

या कालावधीत कंपनीवरील कर्जाचा बोजाही सातत्याने वाढला. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अखेरीस कंपनीवर ९८४.७१ कोटी रुपयांचे कर्ज होते. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हे कर्ज वाढून १,२०६.६० कोटी रुपयांवर पोहोचले. तर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीवरील कर्जाचा बोजा मोठ्या वाढीसह ४,१२०.५३ कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीच्या नेटवर्थमध्येही वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचे नेटवर्थ ६५५.७७ कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये कंपनीचे नेटवर्थ वाढून ६९९.७८ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ते ९५६.२९ कोटी रुपयांवर पोहोचले.

कंपनीच्या रिझर्व्ह आणि सरप्लसबाबत बोलायचे झाल्यास, या कालावधीत कंपनीने या आघाडीवरही वाढ नोंदवली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रिझर्व्ह आणि सरप्लस ६५३.५६ कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये कंपनीचे रिझर्व्ह आणि सरप्लस मोठ्या वाढीसह ६९७.५७ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचे रिझर्व्ह आणि सरप्लस ९४७.४५ कोटी रुपयांवर पोहोचले.

त्याचप्रमाणे ईबीआयटीडीए म्हणजेच अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन्स अँड अमॉर्टायझेशन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २२०.१३ कोटी रुपये होते. ते २०२४-२५ मध्ये वाढून २५६.४० कोटी रुपयांवर पोहोचले. तर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचे ईबीआयटीडीए मोठ्या वाढीसह ५४५ कोटी रुपयांवर पोहोचले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande