
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
भाजपाचे आमदार नमिता मुंदडा यांनी दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुरणवाडी, येल्डा आणि चिचखंडी शिवारातील कापूस, सोयाबीन तसेच इतर पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पावसाच्या खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देत, त्यांच्या नुकसानीची योग्य ती नोंद घेऊन आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis