दुष्काळसदृश संकटात शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळसदृश संकटात पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर: हिम्मत खचू देऊ नका. पावसाने ओढ दिल्याने परभणी
Q


परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

दुष्काळसदृश संकटात पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर: हिम्मत खचू देऊ नका. पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांवर आलेले संकट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हिम्मत खचू देऊ नका, असा धीर दिला.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande