बीड - दुष्काळी परिस्थिती व संभाव्य टंचाईबाबत आढावा बैठक संपन्न
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.) केज विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई, पीक नुकसान, पीक विमा, चारा व रोजगाराच्या प्रश्नांबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. कमी पाऊस आणि पावसातील खंडामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे
अ


बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)

केज विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई, पीक नुकसान, पीक विमा, चारा व रोजगाराच्या प्रश्नांबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली.

कमी पाऊस आणि पावसातील खंडामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करणे, पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणे तसेच पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी, टँकर, जनावरांसाठी चारा-पाणी आणि रोजगाराच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले.बैठक केवळ आढाव्यापुरती मर्यादित न राहता, घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

यावेळी अंबाजोगाई नगराध्यक्ष श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे सोनवणे मॅडम, उपविभागीय अधिकारी श्री. दीपक वजाळे साहेब, तहसीलदार श्री. विलास तरंगे साहेब, अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (CO) श्रीमती प्रियंका टोंगे मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गायकवाड साहेब, पोलीस निरीक्षक (शहर व ग्रामीण), MSEB चे डेप्युटी इंजिनिअर (ग्रामीण व शहर), तालुका कृषी अधिकारी श्री. मुंडे साहेब, गटविकास अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande