अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे अभिनेते गणेश यादव आता सोशल मीडियावर सक्रिय
मुंबई, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते गणेश यादव हे नाव घेतलं की त्यांच्या विविध भूमिका डोळ्यांसमोर उभ्या राहतात. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे गणेश
पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही ‘गणेश यादव’ यांची एन्ट्री


मुंबई, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते गणेश यादव हे नाव घेतलं की त्यांच्या विविध भूमिका डोळ्यांसमोर उभ्या राहतात. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे गणेश यादव आता सोशल मीडियावरही सक्रिय झाले आहेत.

सोशल मीडियाची वाढती ताकद आणि कलाकारांसाठी त्याचं महत्त्व लक्षात घेत गणेश यादव यांनी अधिकृतपणे इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. ganeshyadav_official हे त्यांचं अधिकृत इन्स्टाग्राम हँडल असून, या माध्यमातून ते चाहत्यांशी थेट संवाद साधताना दिसणार आहेत. आजवर मी सोशाल मिडीया पासून दूर होतो पण.. कलाकार म्हणून आपल्या प्रवासातील विविध पैलू, आगामी प्रोजेक्ट्स आणि पडद्यामागच्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणारा आहे.

दरम्यान, गणेश यादव लवकरच ‘संडे १९९६’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर नवी इनिंग आणि पडद्यावर नवी भूमिका गणेश यादव यांच्या या दुहेरी प्रवासाकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande