नेरळ पोलीस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण निरोप
रायगड, 26 सप्टेंबर (हिं.स.) संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभारी अधिकारी राहुल वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणरायाचे भक्तिभावाने पूजन करून अकराव्या दिवशी पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन कर
कर्तव्य आणि भक्तीचा संगम! नेरळ पोलीस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण निरोप


कर्तव्य आणि भक्तीचा संगम! नेरळ पोलीस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण निरोप


रायगड, 26 सप्टेंबर (हिं.स.) संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभारी अधिकारी राहुल वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणरायाचे भक्तिभावाने पूजन करून अकराव्या दिवशी पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रभारी अधिकारी राहुल वरुटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील गणेश मंडळे, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त सांभाळत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिवसरात्र दक्षता घेत यशस्वीपणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.

याच काळात पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या श्री गणरायाची आरती, पूजा व धार्मिक विधी नियमितपणे पार पडले. अकराव्या दिवशी “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन सोहळा पूर्णपणे शिस्तबद्ध वातावरणात, ना डीजे, ना लेझर लाईट, तर सर्व नियमांचे पालन करत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.

कर्तव्य आणि श्रद्धेचा सुंदर संगम घडवणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. गणरायाच्या सेवेसोबतच समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या प्रभारी अधिकारी राहुल वरुटे व त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाला नागरिकांनी सलाम करत कृतज्ञता व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande