विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसची समिती गठीत
मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून काँग्रेस पक्षाने त्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यां
Congress committee


मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून काँग्रेस पक्षाने त्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीत CWC सदस्य माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, आमदार अमित झनक, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार साजिद खान पठाण, आमदार अनिल मांगुळकर, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी महापौर विलास इंगोले आणि स्वाती वाकेकर हे ११ सदस्य आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande