लातुरात रंगणार ‘जल्लोष लोककलेचा’; २७ व २८ सप्टेंबरला बालकलावंतांची मांदियाळी
लातूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबतच बालकलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेतर्फे ‘जल्लोष लोककलेचा’ या लोककला महोत्सवाचे आयोजन २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्या
जल्लोष लोककलेचा


लातूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबतच बालकलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेतर्फे ‘जल्लोष लोककलेचा’ या लोककला महोत्सवाचे आयोजन २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.

बालमनावर लोककलेचे संस्कार व्हावेत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत पोहोचावी, यासाठी बालरंगभूमी परिषदेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून २९ ऑगस्ट रोजी लोककला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर आता बालकलावंतांसाठी लोककला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकनृत्य, एकल लोकगीत गायन आणि एकल लोकवाद्य वादन अशा विविध प्रकारांत स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत ६ ते १५ वर्षे वयोगटातील बालकलावंतांना सहभागी होता येणार आहे.

महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विजेत्या समूह व एकल गटातील कलावंतांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

लातूरातील जास्तीत जास्त बालकलावंतांनी या महोत्सवात सहभागी होऊन लोककलेचा जल्लोष करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी शाखाध्यक्ष रणजित आचार्य (८४४६८६५९०८), शाखा कार्याध्यक्ष तथा लोककला महोत्सव समिती प्रमुख मयूर राजापूरे (९९७०६०२९९०), प्रमुख कार्यवाह प्रा. नवलाजी जाधव (७२७६६६२६२७), समिती सहप्रमुख विशाल वाटवडे (९३५६८०८६८४) आणि सहकार्यवाह रविकिरण सावंत (७०२०३६२१८५) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande