छत्रपती संभाजीनगर विभागातील ITI क्षेत्राला प्रथमच मिळाला राष्ट्रीय सन्मान
छत्रपती संभाजीनगर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। मुळचे ईट येथील आणि स्वातंत्र्यसेनानी देविदास माधव झरकर यांचे नातू, धाराशिवच्या भाई उद्धवराव पाटील शासकीय ITI चे शिल्पनिदेशक डॉ. किरण प्रकाश झरकर यांना आज नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर
अ


छत्रपती संभाजीनगर, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

मुळचे ईट येथील आणि स्वातंत्र्यसेनानी देविदास माधव झरकर यांचे नातू, धाराशिवच्या भाई उद्धवराव पाटील शासकीय ITI चे शिल्पनिदेशक डॉ. किरण प्रकाश झरकर यांना आज नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागातील ITI क्षेत्राला प्रथमच मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान आहे.

17 वर्षांच्या सेवेतून, 250 ग्रामपंचायतींचे ठराव, 10 हजार सह्यांचे आंदोलन, 'स्किलबुक' प्रणाली आणि 'वंदे मातृशक्ती' पुस्तकाद्वारे त्यांनी कौशल्य शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.

धाराशिवच्या मातीतून विज्ञान भवनापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande