राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ड्युरँड कप विजेत्या ईस्ट बंगालला प्रेसिडेंट्स कप ट्रॉफी प्रदान
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात २०२६ च्या ड्युरँड कप विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला प्रेसिडेंट्स कप ट्रॉफी प्रदान केली. ऑगस्टमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान सुपर जायंट्सचा ४-१ ने पराभव करून ई
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ड्युरँड कप विजेत्या ईस्ट बंगालला प्रेसिडेंट्स कप ट्रॉफी प्रदान


नवी दिल्ली, ७ सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात २०२६ च्या ड्युरँड कप विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला प्रेसिडेंट्स कप ट्रॉफी प्रदान केली.

ऑगस्टमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान सुपर जायंट्सचा ४-१ ने पराभव करून ईस्ट बंगालने १३५ वा ड्युरँड कप जिंकला. हे ईस्ट बंगालचे १७ वे ड्युरँड कप विजेतेपद होते. या विजयासह, ईस्ट बंगालने सर्वाधिक ड्युरँड कप विजेतेपदांचा मोहन बागानच्या विक्रमाची बरोबरी केली.

विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, ईस्ट बंगालकडून थिलिबम बिपिन सिंगने १० व्या मिनिटाला, तर एडमंड लालरिंदिकाने १२ व्या, २२ व्या आणि ४४ व्या मिनिटाला गोल केले. एडमंडने हॅट-ट्रिक पूर्ण केली. मोहन बागानचा एकमेव गोल ३३ व्या मिनिटाला मनवीर सिंगने केला.

राष्ट्रपती मुर्मू यांनी ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला ड्युरँड कप स्पर्धा २०२६ ची राष्ट्रपती चषक ट्रॉफी प्रदान केली. याप्रसंगी संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी, ड्युरँड फुटबॉल स्पर्धा सोसायटीचे अध्यक्ष आणि लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्यासह सोसायटीचे अधिकारी आणि ईस्ट बंगालचे फुटबॉलपटू उपस्थित होते.

ड्युरँड कप ही जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. १८८८ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा भारतातील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धांपैकी एक असून, प्रस्थापित फुटबॉलपटू, उदयोन्मुख प्रतिभा आणि सेवा संघांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.

ड्युरँड चषकाच्या १३५ व्या आवृत्तीत श्रीलंकन सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका परदेशी संघासह एकूण २४ संघांनी भाग घेतला. यासह, या स्पर्धेने भारतीय क्लब, सेवा दलांचे संघ आणि आंतरराष्ट्रीय संघांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याची आपली परंपरा कायम ठेवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande