
मुंबई, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। अबंडंटिया एंटरटेनमेंटने आज सिलेक्ट मीडियासोबत आपल्या आगामी चित्रपट “हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा” ची खास घोषणा केली हा चित्रपट “श्री खाटू श्याम जी” बाबा यांच्या पवित्र आणि व्यापकपणे पूजल्या जाणाऱ्या कथेतून प्रेरित आहे.
2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट महाभारतातील पराक्रमी योद्धा बर्बरीक यांच्या असामान्य प्रवासाची कथा मोठ्या पडद्यावर साकारेल. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अमरत्व प्रदान केले आणि पुढे त्यांची खाटू श्याम बाबा म्हणून पूजा होऊ लागली, तसेच आजही लाखो लोकांच्या जीवनमार्गाला त्यांच्यावरील श्रद्धा आणि विश्वास कसा दिशा देतो.
हे या चित्रपटातून मांडले जाईल. भक्त त्यांना प्रेमाने “हारे का सहारा” - आशा गमावलेल्यांचा आधार - असे संबोधतात.
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू येथील त्यांचे प्रमुख मंदिर देशातील भक्ती आणि श्रद्धेच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असून जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.
अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि सिलेक्ट मीडिया यांच्यातील हे सहकार्य खास असून भव्यता, भावनिक खोली, सांस्कृतिक अस्सलता आणि आवश्यक असलेल्या श्रद्धाभावासह सांगण्याच्या समान महत्त्वाकांक्षेला एकत्र आणते.
चित्रपटाबद्दल बोलताना, अबंडंटिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि CEO, विक्रम मल्होत्रा म्हणाले- “राजस्थानमध्ये वाढल्यामुळे लोकांची श्याम बाबांवरील असामान्य श्रद्धा आणि विश्वास मी स्वतः पाहिला आहे. हे केवळ आकडे किंवा यात्रेच्या व्याप्तीतून समजून घेण्यासारखे नाही. त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलतात, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड अंतराचा प्रवास करतात आणि जवळजवळ सहजभावाने समर्पण आणि आशेने त्यांच्याकडे वळतात, त्यातून ही श्रद्धा दिसून येते. ती श्रद्धा माझ्यासोबत राहिली आहे. ही कल्पना कालातीत आणि अत्यंत मानवी आहे. श्रद्धा, त्याग, आशा आणि समर्पणातही सामर्थ्य असते हा विश्वास या भावना भौगोलिक सीमा, पिढ्या किंवा परिस्थिती यांच्याही पलीकडे जातात.
अबंडंटियामध्ये भारतातील काही सर्वात प्रभावी कथा अशा आहेत ज्या पिढ्यानपिढ्या कुटुंबे, श्रद्धा, मौखिक परंपरा आणि जगलेल्या संस्कृतीच्या माध्यमातून पुढे आल्या आहेत, असा आमचा नेहमीच विश्वास राहिला आहे. हारे का सहारा, बाबा खाट्टर श्याम हमारा हा चित्रपट हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल”
चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मितीबाबतची पुढील माहिती लवकरच सांगण्यात येणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर